निसर्गानेच गाऱ्हाणे ऐकले? पैठणचा उजवा कालवा फुटला अन.. ८५ गावांना फायदा झाला

Ahmednagarlive24 office
Published:
mula dam avartan

गेवराई तालुक्यातून नागमोडी आकाराने विविध गावातून जात असलेला पैठणचा उजवा कालवा तीन दिवसापुर्वी तालुक्यातील तळणेवाडी शिवारात फुटून हजारो क्युसेक्स पाणी वाया जात अनेक वस्त्यामध्ये घुसले.

खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने गुळज बंधारा येथील कालव्याचे दरवाजे बंद करून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. याच पाञातील पाणी न.प.च्या गेवराई येथील टाकीतून गेवराई तालुक्यातील ८५ गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकरमधून पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक जवळपासच्या गावात देखील वेळोवेळी पुरवठा करण्यात येत आहे.

वरिल सर्व परिस्थिती पाहता पैठणचा उजवा कालवा फुटला अन गेवराईला फायदा झाला असे बोलले जात आहे. दरम्यान मागणी करुनही गोदावरीच्या बलाढ्य पात्रात पैठणच्या धरणातून पाणी सोडले नसते, मात्र कालवा फुटल्याने नाईलाजाने गोदावरी नदी पात्रात सोडावे लागले.

गेवराई तालुक्यात सध्या विविध गावात ८५  टँकरने पाणी पुरवठा करण्यात येती आहे. तालुक्यात सध्या पाणीटंचाईचा झळा लागत आहे. त्यातच गोदावरी नदी पाञत पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची विविध गावातील नागरिक करत आहे. मात्र पाणी सोडण्यात येत आहे.

त्यातच गेवराई तालुक्यातील विविध गावातून नागमोडी आकाराने जात असलेल्या पिठणच्या कालव्याला भरमसाठ पाणी सोडण्यात आले आहे. मात्र तळणेवाडी परिसरात हा कालवा फुटल्याने हजारो क्युसेक्स पाणी वाया जात परिसरातील शेतवस्तीवर घुसले.

पाणी वाया जाऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने गुळज बंधाऱ्यातील कालव्याचे दरवाजे बंद करून ते पाणी गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात पाण्याची वाढ काहीशी झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान शहागड येथील पैठणच्या जायकवाडी धरणातून थेट गेवराई येथे पाईप लाईन सुरु असून या माध्यमातून न.प. गेवराई येथील पाण्याच्या टाकीतून गेवराईतील विविध उजव्या भागात ८५ टँकरमधून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

शिवाय जिल्ह्यात देखील वेळप्रसंगी करण्यात आला व येत आहे. एकदंर पैठणच्या उजव्या कालव्यातील पाणी गोदावरी नदी पाञत आल्याने ठिकठिकाणी या पाण्यात काहीशी वाढ होऊन पाञ भरल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe