अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- पाथर्डी पालिकेत राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक होते. त्यांनी पाच वर्षात एकाही कामाला विरोध केला नाही. तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार्यांनीच पालिकेचे भुखंड लुबाडले आहेत.
निवडणूका आल्यानंतर पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार झाला? नगरपालिकेच्या चौकशी लावल्याबद्दल अॅड. प्रताप ढाकणे यांना धन्यवाद.
बाजार समितीचे भूखंड विकणारे साडेचार वर्षे झोपले होते ? जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल. तुमचे प्रकरणे वेळ आल्यावर बाहेर काढू, असा इशारा नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना दिला आहे.
शासकिय विश्रामगृहामधे भाजपच्यावतीने आयोजीत पत्रकार परीषदेत डॉ. गर्जे बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गोकुळ दौंड, नंदकुमार शेळके, बंडु बोरुडे, बजरंग घोडके, भगवान साठे, अनिल बोरुडे, रमेश गोरे, महेश बोरुडे,
सुनिल ओव्हळ, नामदेव लबडे, काशीबाई गोल्हार, महेश अंगारखे, रमेश हंडाळ, बबन बुचकुले उपस्थित होते. यावेळी गर्जे म्हणाले, ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेवून नगरपालिकेच्या कार्यकाळात 120 कोटी रुपयांची विकास कामे झाली हे स्वत: त्यांनी मान्य केले आहे.
पण आता होवू घातलेल्या निवडणुकीला कोणत्या तोंडाने लोकांसमोर जायचे हा प्रश्न त्यांना पडल्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर व आमदारावर सवंग लोकप्रियतेसाठी बेछूट आरोप करत आहेत.