अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : डिझेलचा टँकर आगीत जळून खाक ! नगर पाथर्डी महामार्गावरील वाहतूक ठप्प

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर – पाथर्डी मार्गे जात असलेल्या महामार्गावरील मराठवाडी बारव, ता. आष्टी गावाजवळ बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकड़े वीस हजार लिटर पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टायर फुटल्याने आग लागली,

या आगीमुळे मराठवाडी बारव परिसरामध्ये मोठा आगडोंब उसळला. पेट्रोल- डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग लागल्याची माहिती समजताच नगर- पाथर्डी -आष्टी तालुक्यातील सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यानंतर तब्बल दोन तासांनी टँकरला लागलेली आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, टॅकरला लागलेल्या आगीमुळे टँकरचा पूर्णपणे कोळसा झाला.

तर या महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन अडीच तास थांबून राहिली होती. या आगीमुळे मराठवाडी, हारेवाडीश बारव या मुख्य विद्युत लाईनच्या तारादेखील या आगीत वितळून महामार्गावर पडल्या होत्या.

या तारा स्थानिक ग्रामस्थांनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या रात्री बाजूला हटवल्या. पोलीस प्रशासनास स्थानिक ग्रामस्थांनीदेखील मदत केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office