अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात दिराचा भावजयीवर बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सख्ख्या दिरानेच बलात्कार केला याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, होलेवाडी येथे पिडीत महिला ही पती व मुलगा याच्या बरोबर राहते. गुरूवारी रात्री ७.३०वा.पीडितेचे पती हे रानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते.

त्यावेळी पीडिता एकटीच स्वयंपाक घरात काम करत असताना पीडितेचा दीर आरोपी हा घरात आला व पीडितेला म्हणाला की, विहिरीवरील मोटार का चालू केली यावर पीडितेने सांगितले की, मोटारीला मेगा स्टार्टर असल्यामुळे लाईट आल्यावर मोटार चालू झाली असेल,

तर दिराने म्हटले की, तू सतत मोटार चालू करते तू काय माझी बायको आहे का, असे म्हणत पीडितेला खाली पाडून तिचे तोंड दाबून बळजबरीने बलात्कार केला व कोणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

घडलेली घटना पीडितेने तिचे पती , मुलगा यांना सांगितली. यानंतर पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24