अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतील कामकाजात दिव्यांग शासकीय व निमशासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट मिळावी, या मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना देण्यात आले.
राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी तयारी सुरू केलेली आहे.
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची कामे करणे शासकीय दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग निमशासकीय शक्य होत नसल्याने शासन निर्णयानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाऊसाहेब ढोकणे, शंकर आगलावे, गणेश दळवीसह इतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. यासंदर्भात राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना ग्रामपंचायत निवडणूक कामकाजातून शासकीय व निमशासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे
.