पाथर्डी – शेवगाव मतदार संघातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी पदाधिकारी निवडीवरून पाथर्डी -शेवगाव मतदार संघातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद चिघळलेला असून दोन्ही गटांकडून एक दोन नावांना विरोध करण्यात आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना शक्तिप्रदर्शनातून जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या पुढे व्यक्त केल्या असून निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका मांडली.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील पदाधिकारी निवडीवरून नव्या जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी वाळकी (ता. नगर) येथील भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करत आपल्या नाराजीच्या भावना व्यक्त केल्या.

सोमवारी (दि. १८) गोकुळ दौंड, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह शेवगाव-पाथर्डीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यकत्यांनी जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्यापुढे पदाधिकारी निवडीवरून आ. राजळे समर्थकांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना व्यक्त केल्या.

मतदार संघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती न देता झालेली पदाधिकारी निवड कायम करून पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत पक्षवाढीसाठी पदाधिकारी निवडीत नव्या जुन्यांचा समावेश करताना निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत दोन्ही गटात समन्वय साधत मार्ग काढणार आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी गोपाळ दौंड, बाळासाहेब सोनवणे, नगर तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस संतोष म्हस्के, कार्यालय प्रमुख शरद दळवी, दादासाहेब बोठे, आंबादास भालसिंग, गणेश भालसिंग, राम कासार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाची कार्यकारणी जाहिर करताना शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील पदाधिकारी निवड करताना तालुकाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या नाहीत. नव्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत निवडी – करण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित २४ सप्टेंबर रोजी सर्वांनी विश्वासात घेऊन मार्ग काढणार आहे. – दिलीप भालसिंग, भाजप जिल्हाध्यक्ष