स्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी वस्तुंचे वाटपस्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  सण, उत्सव, वाढदिवस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले पाहिजे.

आजच्या युवकांनी समाजाबद्दल आदर, आपलुकीच्या भावनेतून काम केले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोनातून समाजातील गरजूंसाठी काम केले पाहिजे. या भावनेतून कल्पतरु प्रतिष्ठान व विनायकराव देशमुख मित्र मंडळाच्यावतीने स्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले.

गरजूंसाठी जमेल तितके सहकार्य आम्ही वेळोवेळी करत राहू, असे प्रतिपादन मुकूल देशमुख यांनी केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कल्पतरु प्रतिष्ठान व विनायकराव देशमुख मित्र मंडळाच्यावतीने स्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी भेटवस्तुंचे वाटप करताना

अध्यक्ष मुकूल देशमुख. समवेत नितीन आजबे, हर्षवर्धन देशमुख, निलेश वराडे, ज्ञानेश्वर आव्हाड, स्वप्निल वारुळे, विशाल रोहोकले, गणेश चितळकर, आकाश सूर्यवंशी, अभिषेक झोळ, योगेश सुंबे, अभिजित खडके, प्रदीप वरखडे, ओंकार तोरडमल, महेश चव्हाण, गणेश वामन, सुनील देवकुळे, सचिन कांडेकर, स्वप्निल खराडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन देशमुख म्हणाले की, वर्षभर विविध सामाजिक उपक्रम साजरे करून युवकांमध्ये सामाजिक कामाची प्रेरणा निर्माण करण्याचे काम आम्ही करत आहोत. विनायक देशमुख यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करुन शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे केले जात आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय येथील गरजूंना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने गरजूंना मदतीची गरज आहे. हे काम कल्पतरु प्रतिष्ठानने केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24