जिल्हा प्रशासनाकडून ‘अनलॉकची’ नियमावली जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात कोरोनाचा वेग काहीसा मंदावला आहे, यामुळे अनेक गोष्टींना लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे.

त्यानंतर अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात रात्री ९ ते पहाटे ५ दरम्यान असलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायं ७ अशी राहणार आहे. ५ ऑक्टोबर पासून हाॅटेल, रेस्टॉरंट्स, बार खुले होणार होणार असून ५० टक्के क्षमतेने हॉटेल चालवता येणार आहे. इतर सिनेमा गृहे, शाळा महाविद्यालये, सार्वजनिक कार्यक्रम यावरील निर्बंध कायम राहील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24