अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा बॅक ही कारखानादारापुरती मर्यादित न ठेवता केंद्र व राज्य सरकारच्या तसेच संचालक मंडळाने घेतलेले सर्व निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केल्यामुळे जिल्हा बँकेची ओळख ही शेतकऱ्यांची बॅक म्हणून झाली.
पूर्वी बॅंकेला होणाऱ्या नफ्यातून कारखान्यांसाठी कर्ज वाटप करायचे. मात्र मी संचालक झाल्यापासून या गोष्टीला विरोध करीत जिराईत भागातील शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसायासाठी कर्ज देण्याचे काम केले. जिल्ह्यातील एकही शेतकरी खरीप व रब्बी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही.
आमदार नसलो तरी बँकेचे निर्णय लोकांपर्यंत घेऊन गेलो. नगर तालुक्यातील जिल्हा बॅकेच्या माध्यमातून खेळते भांडवल म्हणून ९0 कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर केली आहे. लवकरच पुढील काळात २0०0 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.
शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेचा उपयोग केला जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. जिल्हा बॅकेच्या माध्यमातून गाई-म्हशींसाठी खेळते भांडवल म्हणून आगडगाव, रतडगाव, देवगावमधील शेतकऱ्यांना कर्जरुपी चेकचे वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,
बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक विलास शिंदे, रेवन चोभे, बबन आव्हाड, तुकाराम वाघुले, सरपंच मच्छिंद्र कराळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री कर्डिले पुढे म्हणाले की, या गावांमध्ये शेतकऱ्यांना खेळते भांडवल म्हणून ३ कोटी ७६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
दुधाचा व्यवसाय व रतिब घातल्यामुळे मला दुग्ध व्यवसायकरांच्या व्यथा जाणून आहे. नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १०0 कोटी रुपये कर्ज देण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना अभिलाष घिगे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
यांच्यामुळे जिल्हा बॅकेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक लाभ झाला आहे. तसेच दुध व शेती व्यवसायामध्ये मोलाची मदत झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात श्री. कर्डिले यांनी दुग्ध व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना आर्थिक मदत झाली आहे.
बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोलाची मदत केली. बाजार समितीचे उत्पन्न १ कोटीवरून १२ कोटीवर नेण्याचे काम केले आहे. लवकरच बाजार समिती पुढील काळात कर्जमुक्त होईल. काही लोक नाहक बाजार समितीला बदनाम करण्याचे काम केले आहे. या लोकांना त्यांच्या भागात काय काम केले ते जाहीर करावे.
असे ते म्हणाले. मच्छिंद्र कराळे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. ७0 टक्के लोक शेती व्यवसाय करत आहे. या संकटामध्ये व्यापारासह शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यामध्ये माजी मंत्री कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. आगडगाव, रतडगाव व देवगाव या गावांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved