अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांना सहकारातील आदर्श माणून जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. अडचणीतील सर्वच कारखान्यांना जिल्हा बँकेने मदत केली.
आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली वृद्धेश्वर कारखान्याला उज्वल भवितव्य असून कोणत्याही नियमांचा अडसर न बाळगता कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँकेची तिजोरी खुली ठेवली जाईल, असे माहिती बँकेचे संचालक तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.
श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष खेडकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आकोलकर,
कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, ज्येष्ठ नेते सोमनाथ खेडकर, गोकुळ दौंड, माजी अध्यक्ष उद्धव वाघ, सरव्यवस्थापक भास्कर गोरे आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. कर्डिले म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जिल्हा सहकारी बँकेने ३ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले.
राज्यात सर्वाधिक अल्प मुदतीचे कर्ज नगर जिल्हा बँकेने देऊन विविध प्रकारे अर्थसाह्य करून बँकेच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक सशक्त झाली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सूचना अंमलात आणून साखर कारखान्यांनी उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. रोगाचा प्रभाव साखर उद्योगावर सुद्धा पडला आहे.
साखरेला अजिबात उठाव नाही. कर्ज कसे फेडावे अशी मुख्य अडचण कारखान्याकडे आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर केंद्राकडून साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ होऊ शकते. इथेनॉलचा प्रकल्पाचा प्रस्ताव वृद्धेश्वर कारखाने सादर करावा त्यास त्वरित मंजुरी देऊ वृद्धेश्वरचे पालकत्व आपण स्वीकारले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved