अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांचे प्रमाण सुमारे ७० टक्के असून, दुसरा डोस घेतलेल्याचे प्रमाण २६ टक्के इतके आहे.
त्यामुळे उर्वरित पहिला व दुसरा डोस घेण्याचे प्रमाण तीस टक्के बाकी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वानी पुढे यावे.
सर्व संघटना मिळून ७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीकरणामध्ये सहभागी करून एक नवा विक्रम प्रस्तापित करण्याचा मानस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील टास्क फोर्सची सहविचार सभा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.क्षीरसागर म्हणाले,
ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, आशा वर्कर, तसेच आरोग्य कर्मचारी हे सर्व शिक्षकांना सहकार्य करतील, त्यांनी सर्वे करावा. जे नागरिक अजूनही लसीपासून दूर आहेत त्यांना या सर्वांच्या सहकार्याने लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल, असे सांगितले.