अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोली, मुख्याध्यापक खलील शेख, रफिया खान, एटीयुचे चेअरमन नज्जू पहेलवान, फिरोज खान आदिं मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती उर्दू विभागाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी या बैठकीस ऑनलाईन मार्गदर्शन केले.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे – जिल्हाध्यक्ष – मोहंमद समी शेख, जिल्हा सचिव – शेख मोहंमद मुजीब, उपाध्यक्ष शेख अकिल अहमद, मुन्नवर खलील (संगमनेर), मोहंमद तन्वीर (श्रीरामपूर),
कोषाध्यक्ष – खान इमरान अय्युब, सहसचिव – खान नजीब नुरईलाही, पठाण अरबाज (श्रीरामपूर), मानद सचिव – मुन्नवर हुसेन, खजिनदार – अतिक शेख कादर (कोल्हार), महिला प्रतिनिधी – इनामदार गुलनाज, मार्गदर्शक – डॉ.प्रा.सलाम सर, जाकीर सय्यद, अबुनसर सैय्यद, शेख अशफाक अहमद.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्य सचिव सुनिल गाडगे म्हणाले, आज शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत; ते सोडविण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक भारती संघटना शासनाकडे वेळोवेळी दाद प्रसंगी आंदोलने करुन ते सोडवत आहेत.
अल्पसंख्यांक संस्था व शिक्षकांचे विशेषत: उर्दू माध्यमांबाबत शासनाचे उदासिन धोरण असून, त्यासाठी संघटीत लढा देण्याची गरज आहे. यासाठीच नवीन कार्यकारिणी उर्दू शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल. त्यास शिक्षक भारती संघटनेचे राज्य व जिल्ह्यातील पदाधिकारी सहकार्य करतील, असे सांगितले.
याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख म्हणाले, शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून उर्दू शाळा व शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.
संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. उर्दू शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांना आपले प्राधान्य राहील, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक खान नजीब यांनी केले तर सूत्रसंचालन इमरान खान यांनी केले. शेवटी शेख अकिल यांनी आभार मानले.