अहमदनगर बातम्या

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणातील ‘तो’ महत्वाचा अहवाल अखेर तयार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे.

हा अहवाल सोमवारी (ता.२९) राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे सादर होईल, अशी माहिती समजते आहे. याप्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यावर काय निर्णय घेतात ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयातील आगीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती.

घटनेसंदर्भात समितीच्या अनेक बैठका झाल्या व अनेकांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. विद्युत पुरवठा, रुग्णालयाच्या वार्डमध्ये असलेली बेडची संख्या, घटनेच्या वेळी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी,

रुग्णांचे नातेवाईक, आग विझवण्यासाठी पोहोचलेले अग्निशमन दल, आग पसरण्यासाठी ठरलेली कारणे, अडचणी, घटनेच्या वेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा आदी मुद्द्यानुसार चौकशी समितीने अभ्यास केला.

सुमारे ६५ पेक्षा जास्त पानांचा अहवाल असून घटनेच्या विविध पैलूंचा अभ्यास करत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री काय निर्णय घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office