अहमदनगर बातम्या

जिल्हा रुग्णालय आग प्रकरण: तेरावा बळी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.गोदाबाई पोपट ससाणे (वय ७० वर्षे रा. वांगदरी ता.श्रीगोंदा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाततील अतिदक्षता विभागात आग लागून ११जणांचा मृत्यू झाला होता

तर ६जण गंभीर जखमी झाले होते. या जखमीपैकी एका रुग्णाचा १७रोजी मृत्यू झाला होता. आता शुक्रवारी परत एका जखमी झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेत आतापर्यंत तब्बल १३जणांचा मृत्यू झाला आहे.

Ahmednagarlive24 Office