अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र पिंपळनेरला श्री संत निळोबाराय महाराजांच्या “अभंग गाथा प्रकाशन” सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.
यामुळे पवार हे पारनेरला येणार आहे. तसेच यावेळी ते १ कोटी रुपये खर्चाच्या निळोबारायांच्या वाडयातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार कामांचे भूमिपूजन देखील पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान संत निळोबाराय महाराजांच्या दिंडीला १२५ वर्षांची परंपरा असून पंढरपूर येथील आषाढी वारीत राज्यातील मानाच्या दिंड्यांमध्ये ९ वे स्थान आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधित ह.भ.प.डाॅ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या नियोजनाखाली भक्ती पंढरी सोहळा सुरू आहे.
२१ नोव्हेंबर रोजी संत निळोबाराय महाराज अभंग गाथा प्रकाशन सोहळा, निळोबारायांच्या वाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते होईल.
यावेळी ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, चैतन्य महाराज देगलूकर आदी उपस्थित राहणार आहेत.