अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच होते.
दरम्यान या प्रकरणी जिल्हा रुग्णालय परिचारिका, डॉक्टरांनी नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. मागील 11 दिवस जो लढा दिला आणि आज आरोग्यमंत्री
यांनी खास वेळ देऊन शिष्ट मंडळाशी याबाबत चर्चा केली असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना अध्यक्ष सुरेखा आंधळे यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या कि, आपल्या मागण्या, म्हणणे यावर शासन विचार करील, कुणावरही अन्याय करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
परिचारिका संघटना या निर्दोष परिचारिका यांच्या पाठीशी असून न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आमच्या परिचरिकरांना न्याय मिळेल आणि खरे दोषी जेल मध्ये लवकर जातील। असा विश्वास परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी व्यक्त केला आहे.