अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील कोविडच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या दाखल गुन्ह्यात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह सुमारे 100 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी दिली.
आगीची घटना मोठी असल्याने गुन्ह्यात तपासाची व्याप्ती देखील मोठी आहे. जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याचा तपासाच्या सुरूवातीला वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका, अशा चार जणांना अटक केली आहे. या घटनेतील निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे.
त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी सुरेश ढाकणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान मिटके या गुन्ह्यात तांत्रिक पातळीवर तपास करत असल्याने गती मिळताना दिसत नाही.
तांत्रिक पातळीवर तपास करताना त्यातील त्रुटी शोधून गुन्ह्यात दोषसिद्धता करायची आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याची प्रतिक्रिया उपअधीक्षक मिटके यांनी दिली.