अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्हा नियोजन समितीची सभा दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सावेडी येथील माऊली सभागृहात ही बैठक होणार असून या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसुचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता,
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसुचित जाती उपयोजना) प्रारुप आराखड्यास मान्यता, यापूर्वी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे तसेच
अध्यक्षांच्या संमतीने येणारे आयत्या वेळचे विषय यावर चर्चा होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र भोसले यांनी कळविले आहे. या बैठकीस सर्व यंत्रणाप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.