राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, विखेंचा आम्हाला फायदाच…

Maharashtra News: ‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्या पक्षात जातात, तो पक्ष जिल्ह्यात कमकुवत होतो. त्यामुळे आता नगरमध्ये भाजप कमकुवत होऊन राष्ट्रवादीला फायदाच होईल,’

असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत राज्यस्तरीय ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे,’

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशी माहिती जिल्हाध्यक्ष फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘शिबिरासाठी शिर्डीची निवड करण्यामागे तेथे असणाऱ्या सोयीसुविधांचा विचार केला आहे. त्या भागातील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्याचा उददेश नाही. उलट विखेंचा आम्हाला फायदाच होणार आहे.

विखे ज्या पक्षात जातात, तो पक्ष कमकुवत होतो, असा अनुभव आहे, असे फाळके यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावरही फाळके यांनी टीका केली. पायाखालची वाळू घसरत असल्याने भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या आमदारांवर टीका करीत असल्याचे फाळके म्हणाले.