अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या टाळेबंदीच्या काळात सलून व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यानंतर राज्यातील सलून व्यावसायिकांनी शासन निर्देशांचे पालन करीत आपल्या सेवा सुरू केल्या आहेत.
तसेच ग्राहकांच्या आरोग्याची दक्षता घेत उपाययोजना केलेल्या आहेत. सलून सेवा ही महत्त्वाची असून या निमित्ताने दररोज मोठा ग्राहकांचा संपर्क येतो.
त्यामुळे शासनाने कोरोना लसीकरण सुरू केल्यानंतर सलून व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सलून व्यावसायिकांना आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टचे विकास मदने, अहमदनगर जिल्हा सलूनचालक मालक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जनार्दन वाघ,
संजय मदने, शेख सत्तार, भाऊसाहेब काळे, गणेश कदम, शिवाजी दळवी, अजय कदम, नीलेश शिंदे, अशोक खामकर, सुनील खंडागळे, किशोर मोरे, सुरेश राऊत आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.