जिल्हा पोलीस अधीक्षक रमले हिवरे बाजारच्या वनराईत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी सहकुटुंब भेट आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली यावेळी त्यांचे समवेत त्यांची पत्नी सौ.मीनल पाटील,मुलगा-वृषभ पाटील होते.

यावेळी त्यांनी विविध विकास कामाची पहाणी करून माहिती घेतली आणि आनंद व्यक्त केला.पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, हिवरे बाजार येथील कृषी क्षेत्रातील प्रगती खूपच उल्लेखनीय आहे.वर्षभरात ३०० ते ४०० मी.मी.दरम्यान पाऊस पडूनसुद्धा हिवरे बाजार येथील शेतकरी कृषी उत्पादनात तसेच दुग्धव्यवसायात अव्वल आहेत.येथे ट्रॅक्टर, जे.सी.बी.,पोकलन अशा स्वरुपात शेतीपूरक व्यवसाय दिसून येतो.

कल्पक व नियोजनबद्ध वृक्षसंवर्धनामुळे निर्माण झालेली हिरवाईमुळे प्राणीजीवनही समृद्ध आहे मनुष्य व पक्ष्यांना विविध फळेही पुरविते.

हिवरे बाजार येथील वन व जलसंवर्धन पाहिल्यास कोकणात आल्याची अनुभूती येते. प्रत्येक गावाला हिवरे बाजारसारखे नेतृत्व व हिवरे बाजारसारखा ग्रामस्थाचा विचार मिळाल्यास आदर्शाची एक चळवळ देशात निर्माण होऊ शकते.

गाव अत्यंत स्वच्छ आहे कारण गावातील प्रत्येक नागरिक या कार्यामध्ये मनापासून सहभागी असतो.सामाजिक आणि धार्मिक एकोप्याचे खरेखुरे दर्शन हिवरे बाजारमध्ये होते असे गौरवउदगार पाटील यांनी पुढे बोलताना काढले.

सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शिवारपाहणी करताना त्यांनी स्वत: सारथ्य केले.संपूर्ण पाहणी झाल्यांनतर सरपंच पोपटराव पवार यांचे घरी सहकुटुंब स्नेहभोजन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24