अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु,असं मुख्यमंत्री म्हणाले होते. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिलं होतं.
ते सरकार पूर्ण करत आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल. दरम्यान ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात मदत मिळणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटीचा असणार आहे.शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved