अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकर्यांना 125 रुपये जास्तीचा भाव देण्यात आला आहे.
पुर्वीचा भाव 2500 तर दिवाळी निमित्त वाढीव 125 एकूण 2625 प्रति टन ऊसाला भाव देण्यात आला आहे. तर कामगारांसाठी 20 टक्के दराने बोनस व एक महिन्याचे सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले आहे. तसेच कारखान्यातील रोजंदारी कामगारांना दिवाळी निमित्त एक महिन्याचा पगार देण्यात आला आहे.
सदरील सर्व रक्कम शुक्रवार (दि. 30 ऑक्टोंबर) रोजी कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड केल्याबद्दल अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री मधुकरराव पिचड, व्हाईस चेअरमन तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर,
सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांचा अकोले तालुका साखर कामगार सभेच्या वतीने सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी आभार मानले. या निर्णयाने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्यातील सर्व कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved