अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-सहकार चळवळीसाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
यांच्या नेतृत्वाखाली सन २०१९-२० मध्ये गळितास आलेल्या ऊस उत्पादकांचे दीपावलीनिमित्त १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर चालणाऱ्या या कारखान्याने कायम शेतकरी, सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा विश्वास जपला. कायम उच्चांकी व एकरकमी एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्याची परंपरा राखली. २०१९-२० मध्ये गळितास आलेल्या उसास यापूर्वी २ हजार ५३० रुपये प्रतिटन भाव दिला.
दीपावलीनिमित्त आणखी १०० रुपये प्रतिटन भाव दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २ हजार ६३० रुपये भाव मिळाला आहे. कोरोना संकट व आर्थिक महामंदी असतानाही दिवाळीत कामगारांना २० टक्के बोनसपोटी ५ कोटी ३८ लाख ७५ हजार, तर ३० दिवसांच्या सानुग्रह अनुदानामधून
२ कोटी ६८ लाख रुपये आणि शेतकऱ्यांच्या ठेवीचे १ कोटी ४८ लाख रुपये देण्यात आले. तसेच कारखान्याच्या सभासदांना १५ किलो मोफत साखर वाटप सुरू आहे. सभासदांच्या ठेवीवरील व्याज देखील बँकेत वर्ग करण्यात आले.
दीपावलीसाठी ऊस पेमेंट २ कोटी ५१ लाख, ठेवींवरील व्याज २ कोटी आणि बोनस व सानुग्रह अनुदानाचे सुमारे ८ कोटी असे एकूण १२ कोटी ५१ लाख रुपये दिवाळीत बाजारात आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या बाजारपेठेला चालना मिळणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved