दिवाळी दोन दिवसांवर तरी कर्मचारी पगारविना; आमदार मात्र निर्धास्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जनतेची सेवा करण्यासाठी जनतेमधून म्हणून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी स्वतःची राजकीय पोळी भाजून झाली कि जनतेचे त्यांना काही देणेघेणे राहिलेले नसते असाच काहीसा प्रकार शेवगाव तालुक्यात घडत आहे.

दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे, तरी शेवगाव नगरपरिषदेचे कर्मचारी पगारविना आहे. यातच जनतेचे देणेघेणे नसलेल्या व केवळ नावापुरत्याच मर्यादित असलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्या निवास्थानासमोर आज आंदोलन करणार आहे. शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे 4 महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे.

या मागणीसाठी शेवगाव नगरपरिषद वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेने ‘थाळी नाद’ पुकारले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित कामगार संघटनेने बुधवारी सकाळी शेवगाव नगरपरिषदेच्या कार्यालयापासून शांततेच्या मार्गाने प्रा. किसन चव्हाण

यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे आखेगाव रोडवर असलेल्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. तथापि गोपीनाथ मुंडे चौकाजवळ पोलिसांनी पदाधिकार्‍यांसह कामगारांना अडविले व थाळी आंदोलन करण्यापासून रोखले.

त्यानंतर शेवगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ यांनी पदाधिकारी व कर्मचार्‍यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चा देखील निष्फळ ठरली. जोपर्यंत कामगारांचे थकीत वेतन मिळत नाही. तोपर्यंत सर्व कामगार काम बंद आंदोलन सुरूच ठेवतील,

अशी भूमिका घेतली यावेळी पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, भाकपचे संजय नांगरे, मनसेचे गणेश रंधवणे, ‘वंचित’चे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली.

या अटकेचा निषेध करीत कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले असून गुरुवारी (दि. 12) सकाळी 10 वाजल्यापासून नगरपरिषदेचे कर्मचारी सत्ताधारी 21 नगरसेवकांच्या घरासमोर थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24