शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नको

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील शाळांच्या परिसर हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीपासून मुक्त असला पाहिजे. त्यादृष्टीने सर्व शाळा परिसरांचा अहवाल येत्या आठवडाभरात देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच इतर आरोग्य यंत्रणांशी संबंधित विषयांसंदर्भात आज येथील जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

याबैठककीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे,

महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, राज्य होमिओपॅथिक कौन्सिलचे सदस्य डॉ. अजित फुंदे यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्या होत्या.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले कि, कोरोना कालावधीत सध्या आयुष उपचार पद्धतीचा वापर कोविड केअर सेंटरमध्ये केला जात आहे,

रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिल्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात ०१ डिसेंबरपासून क्षयरोग रुग्ण आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहिम राबविली जाणार आहे. आरोग्य यंत्रणांनी समन्वय साधून ही मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24