निळवंडे डाव्या कालव्याच्या शेवटच्या भागातील काम तातडीने करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : निळवंडे डाव्या कालव्याच्या शेवटच्या भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्याला पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केली आहे.

राहाता तालुक्यातील वाकडीनजीक धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत रेल्वे मार्गाखालून होत असलेल्या निळवंडे कालवा क्रॉसिंगच्या पाहणीदरम्यान अॅड. काळे बोलत होते. उत्तर नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील ६ गावांसह १८२ अवर्षणग्रस्त गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील विक्रांत रूपेंद्र काले व समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या जनहित याचिका व जनरेट्यामुळे मार्गी लागले आहे.

दि. ३१ मे रोजी त्याची तब्बल ६ मुदत वाढीनंतर राज्य सरकारला व जलसंपदा विभागाला डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी लागली आहे. विलंबामुळे जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले गेले आहे.

त्या नंतर उजव्या कालव्याचे भूसंपादन व कामे अंतिम टप्प्यात आली असून या वर्षीचा तीव्र दुष्काळ पाहून कालवा कृती समितीच्या मागणीप्रमाणे लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरून देण्यात येत आहे. पाझरतलाव भरण्यासाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुदत देण्यात आली होती;

मात्र अकोले तालुक्यातील पाणी गळती रोखण्याचे काम पावसामुळे प्रलंबित राहिले आहे. पाझर तलाव भरण्याचे काम आठवडाभर पुढे ढकलले आहे. तत्पूर्वी निळवंडे कालवा कृती समितीने शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कालवा कृती समितीचे विधिज्ञ अजित काळे यांचा वाकडी नजीक धनगरवाडी येथे कालवा पाहणी दौरा आयोजित केला होता.

याप्रसंगी नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले, नानासाहेब गाढवे, अनिल औताडे, रावसाहेब मासाळ, राजेंद्र थोरात, राजू रक्टे, साहेबराव आदमाने, अनिल रक्टे, दगडू रक्टे, आलाराम रक्टे, अनिल भोंडे, पुंजाजी रक्टे, दौलत झनान, विलास रक्टे, जानकु आदमाने,

पाराजी रक्टे, ज्ञानदेव आदमाने, लक्ष्मण राहींज, अशोक लांडे, बाळासाहेब शेळके, अण्णा आदमाने, केरू रक्टे, नानासाहेब रक्टे, पाराजी रक्टे, हरिभाऊ लांडे, अरुण मंडलिक, संभाजी आदमाने, भीमा रक्टे, महेश रवटे, वसंत रक्टे, संपत भुसारी, जितेंद्र भोंडे, गोपीनाथ खरात, रामभाऊ आदमाने आदी उपस्थित होते