‘कोरोना युद्ध जिंकण्यासाठी ‘हे’ करा अन्यथा तिरडी आंदोलन’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

ही लढाई जिंकण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित कोरोना चाचणी केंद्र, कोरोना तात्पुरते रुग्णालय सुरू करावे अन्यथा नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी प्रांताधिकार्‍यांना भेट देऊन आंदोलन करू

असा इशारा जनविकास आघाडीचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे, भाजयुमोचे विशाल यादव, अक्षय वर्पे यांनी दिला. अहमदनगर महानगरपालिका, संगमनेर, देवळाली प्रवरा नगरपालिका,

शिर्डी नगरपंचायतने तेथील नागरिकांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन मात्र वेळकाढूपणा करत आहे.

देवळाली-प्रवरा नगरपालिकेचे वार्षिक बजेट अवघे 30 कोटी रुपये आहे. तर श्रीरामपूर नगरपालिकेचे वार्षिक बजेट तब्बल 150 कोटी रुपये असूनही उदासिनता का ?

असं प्रश्न उभा करत नगरपालिकेच्या मालकीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह, मेनरोडवरील आगाशे हॉल,

विविध भागांतील शाळा सध्या रिकाम्या आहेत. त्या जागेत अथवा शहरातील एखाद्या मोठ्या रुग्णालयात नगरपालिकेने चाचणी केंद्र व कोरोना रुग्णालय तात्काळ सुरू करणे गरजेचे असल्याचे केतन खोरे, अक्षय वर्पे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24