कोरोना विषाणू शरीरात किती दिवस राहतो माहित आहे ? वाचून बसेल धक्का …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाबाबत संशोधनानुसार जास्तीत जास्त ८३ दिवस हा व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात राहू शकतो, ही बाब उघड झालीय. वास्तविक, सर्वांच्याच शरीरात हा व्हायरस इतके दिवस राहत नाही.

मात्र या विषाणूचा शरीरात राहण्याचा अधिकाधिक कालावधी हा ८३ दिवसांचा असल्याचं स्पष्ट झालंय. द लान्सेट माईक्रोब ने याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यानंतर ही बाब जगासमोर आलीय.

आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर साधारण ९ ते १० दिवस हा विषाणू शरीरात राहत असल्याचं सांगितलं जातं.

मात्र नव्या संशोधानुसार जवळपास ३ महिने हा विषाणू शरीरात राहत असल्याचं दिसून आलंय. ब्रिटन आणि इटलीमध्ये एकूण ७९ जणांचं निरीक्षण करण्यात आलं.

त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. या प्रयोगातील एक शास्त्रज्ञ डॉ. अटोनियो हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडचे रुग्ण दाखल असणाऱ्या इस्पितळांमध्ये हे संशोधन करण्यात आलं.

कोविड रुग्णांसाठी पहिले ५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अशा रुग्णांना क्वारंटाईन करणं गरजेचं असतं. शिवाय एकदा पॉजिटीव्ह आलेल्या व्यक्तीची दुसऱ्यांदा चाचणी करण्याची गरज नसते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24