Radhakrishna Vikhe Patil : शिंदे-फडणवीस सराकरचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर झाला आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त दिवसांनी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. ते सहाव्यादा मंत्री झाले.
मंत्रीमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळल्यानंतर विखे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत शिर्डीहूनच मुंबई गाठली व मंत्री पदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात शपथ घेणारे ते पहिले मंत्री ठरले.
विखे पाटील यांचा राजकीय प्रवास शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा आहे. महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये आणि विरोधी पक्षनेते होते.
जून २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.
विरोधी पक्षनेतेपदी असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांचे फडणवीस यांच्यांशी चांगले संबंध झाले आणि राजकीय घडामोडींनंतर गेल्या निवडणुकीत ते भाजपमध्ये दाखल झाले.
मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक महाविकास आघाडी स्थापन झाली आणि भाजपचे सरकार येऊ शकले नाही. मात्र, काळात विखे स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी ही संधी साधून नव्या पक्षात म्हणजे भाजपमध्ये आपले स्थान पक्के केले.
सहाव्यांदा मंत्री झालेले विखे पाटील यांचा हा राजकीय प्रवास.
१ मार्च १९९५ – विधानसभा सदस्य (शिर्डी विधानसभा)
१९९७ ते १९९९ – मंत्री (कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय)
जुलै १९९९ – विधानसभा सदस्यपदी निवड
ऑक्टोबर २००४ – विधानसभा सदस्यपदी निवड
१९ फेब्रुवारी २००९ – मंत्री (शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री,औरंगाबाद जिल्हा)
ऑक्टोबर २००९ – विधानसभा सदस्यपदी निवड
७ नोव्हेंबर २००९ – मंत्री (परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय)
१९ नोव्हेंबर २०१० ते २७ सप्टेंबर २०१४ – मंत्री (कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती
१९ ऑक्टोबर २०१४ – विधानसभा सदस्यपदी निवड
१० नोव्हेंबर २०१४ — काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड
२४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते
१६ जून २०१७- भाजपाच्या वतीने गृहनिर्माण मंत्री