डॉक्टरांनी केला कोट्यवधींचा घोटाळा; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- नगर अर्बन बँकेमध्ये डॉक्टरांनी एकमेकांना जामीन राहून रुग्णालयासाठी नवीन मशिनरी खरेदी करायची, असे सांगून पुण्याच्या स्पंदन मेडिकेअर तसेच निर्मल एजन्सी यांच्याशी संगनमत करून नगर अर्बन बँकेमध्ये 22 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

हे कर्ज बँकेने केडगाव व मार्केट शाखेतून त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. बँकेने वसुलीसाठी तगादा सुरु केला होता.

या प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक गंभीर बाबी पुढे आल्या होत्या. संबंधित एजन्सीने कोणत्याच प्रकारची मशनरी घेतली नाही व रुग्णालयात ती आलेली नाही, हे यातून प्रामुख्याने उघड झाले.

हॉस्पीटलसाठी मशिनरी खरेदीस कर्ज घेऊन कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता स्वत:च्या फायद्यासाठी रक्कम वापरून नगर अर्बन बँकेची 22 कोटी 90 लाख रुपयांची फसवणूक केल्या

प्रकरणी सात जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉक्टरांसह मशिनरी पुरविणार्‍या संस्थांचा समावेश आहे.

या आरोपींमध्ये डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. निलेश शेळके, गिरीश अग्रवाल, निर्मल एजन्सी, स्पंदन मेदडीकेअर (पुणे) यांचा समावेश आहे.

कोतवाली पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24