अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगावातील एका अल्पवयीन मुलीच्या संशयीत मृत्यूप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याच्या संशयावरून जीवे ठार मारून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याबाबत तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवत मयत मुलीच्या आई, वडिलांसह कुटुंबातील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामध्ये मुलीवर उपचार करणार्या डॉक्टराचाही समावेश होता. याप्रकरणी हवालदार आप्पासाहेब वैद्य यांनी याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले आहे, जालिंदर पंढरीनाथ गारुडकर (रा.तिसगाव) यांच्या अल्पवयीन मुलीस 15 जून 2021 रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला पाथर्डीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. त्यांनतर पुन्हा तिसगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वॅबची चाचणी केली.
ती निगेटिव्ह आली. दुसर्या दिवशी तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला दवाखाण्यात घेऊन जाऊन आणले. त्यानंतर गोळ्या- औषधे घेऊन मुलगी झोपली. त्यानंतर तिने हालचाल केली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांना फोनवरून याबाबत कळवले. काही जणांच्या उपस्थित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या मुलीचा तिसगाव येथे अकस्मातपणे मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मृत्यू बाबत मुलीच्या वडिलांनी डॉक्टर, पोलीस किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेला कळवले नाही.
तिच्या प्रेतावर परस्पर अंत्यसंस्कार केले. मयत मुलीच्या उपचाराबाबत वैद्यकीय कागद पत्रे कुटुंबीयांनी सादर केले नाही. त्यामुळे सदर मुलीच्या मृत्यूबाबत अधिक चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी, असे फिर्यादीत म्हटले आहे.