Ahmednagar News : शवविच्छेदन केल्याने मृत्यूचे गूढ खरोखर उलगडते का? शवविच्छेदनाचा निर्णय कोण घेतो? पोस्टमार्टमसाठी कुणाची परवानगी आवश्यक असते? जाणून घ्या सर्व..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शवविच्छेदन अर्थात पोस्टमार्टम हा शब्द आपण बऱ्याचवेळा ऐकतो. परंतु याबाबत आपल्या मनात अनेक शंका असतात, अनेक प्रश्न असतात. शवविच्छेदन केल्याने मृत्यूचे गूढ खरोखर उलगडते का? शवविच्छेदनाचा निर्णय कोण घेतो? पोस्टमार्टमसाठी कुणाची परवानगी आवश्यक असते? आदी प्रश्न अनेकांना पडलेले असतात.

खून, अपघाती मृत्यू अथवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे शवविच्छेदन केले जाऊ शकते. शवविच्छेदनातून मृत्यूचे नेमके कारण व वेळ समजू शकते. यापूर्वी अनेक घटना अशा उघडकीस आल्या आहेत की, अपघात भासविला होता मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा खून केल्याचे समोर आले.

त्यामुळे शवविच्छेदन करणे गरजेचे असते असेच म्हणावे लागेल. शवविच्छेदन केल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समोर येतेच शिवाय नंतर कोणतेही प्रश्न उद्भवत नाहीत. शवविच्छेदनाला विरोध करण्याऐवजी शवविच्छेदन करण्यावर भर असला पाहिजे असे मत शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी व्यक्त केले आहे.

शवविच्छेदनाचा निर्णय कोण घेत असतो ?

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद असेल तर पोलीस हा निर्णय घेतात, तसेच अपघात असो की नैसर्गिक मृत्यू, याचे कारण समजण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि पोलिस शवविच्छेदन करण्यासाठी आग्रही असतात.

शवविच्छेदनासाठी कुणाची परवानगी आवश्यक ?

बऱ्याचवेळा आपल्या आप्तस्वकीयाचा मृत्यू नैसर्गिक झाल्यास नातेवाईक बऱ्याचदा शवविच्छेदन न करण्याची विनंती करतात. तेव्हा डॉक्टर, पोलिस सहानुभूती दाखवून ते करतही नाहीत. परंतु जर पोलिसांना मृत्यू शंकास्पद वाटत असेल तर कोणाचीही विनंती अथवा मागणी विचारात न घेता शवविच्छेदन केले जाते.