कुत्र्याला मारहाण, अधीक्षक कार्यालयातील पोलिसाविरोधात गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  जखमी कुत्र्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आणि ही मारहाण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई अंकुश बोडखे यांनी केली.

असा आरोप केल्याने त्यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अंकुश बोडखे असे कर्मचार्‍याचे नाव आहे.

पिपल फॉर अ‍ॅनिमल फाउंडेशन (पीएफए) नगरच्या स्वयंसेविका अंतरा आण्णासाहेब हसे (वय- 20 रा. स्टेशन रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, हसे या पिपल फॉर अ‍ॅनिमल फाउंडेशनच्या स्वयंसेविका म्हणून काम करतात. त्यांची मैत्रिण सिमरण मोटवाणी या नगर शहरातील मिस्किन मळा या ठिकाणी राहतात.

सोमवारी दुपारी मोटवाणी यांच्या घराजवळील अपार्टमेंट परिसारात एक कुत्रा जखमी झालेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर हसे व मोटवाणी यांनी त्या जखमी कुत्र्याव उपचार केले आणि कुत्रा मोटवाणी यांच्या अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले.

याच अपार्टमेंटमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी बोडखे यांनी त्या कुत्र्याला काठीने मारहाण केली. त्यामुळे उपचारादरम्यान त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. जखमी कुत्र्याला काठीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादी हसे यांनी केला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24