अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :-महिलांना रोजगार मिळावा आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून अहमदनगरमधील ३० वर्षाचा तरूण मयुर कुऱ्हाडे सतत प्रयत्न करत असतो.
Ecocradle Essential नावाच्या ब्रँडच्या माध्यमातून ते नेहमी पर्यावरण जपत नावीन्यपुर्वक उपक्रम राबवत असतात. Ecocradle essential च्या माध्यमातून आजपर्यंत 30 पर्यावरण पुरक वस्तूंची निर्मिती केली आहे.
महिलांना रोजगार मिळावा, पण पर्यावरणाला धक्काही नाही लागावा आणि हाताने बनवलेले पण टिकाऊ, असे प्रोडक्ट बनवण्याच्या कुऱ्हाडे हे नेहमी प्रयत्नात असतात.
हाच विचार करून समाजसेवेची गोडी जपत कुऱ्हाडे यांनी ह्या होळीला नवीन रंग बाजारामध्ये घेऊन आले व फुल ना फुलाची पाकळी म्हणून जवळपास १०० महिलांना रोजगार देण्याचे काम त्यांनी या महिनाभरात केले आहे.
या उपक्रमात त्यांनी वैयक्तिकरित्या गरजू व होतकरू महिलांचा शोध घेतला व उत्तराखंडमधील ग्रामीण भागातील महिलांना रंग कसे बनवायचे हे शिकवून त्यांच्याकडून पाना-फुलांपासून वाळवून, त्याची पावडर करून नैसर्गिक रंग बनवून घेतले.
हे रंग दिसायला सुबक अशा पर्यावरण पुरक डब्यामध्ये दिसायला आकर्षक पण नैसर्गिक रंग बनवून या होळीला ग्राहकापर्यंत त्यांनी पोहचविले. ही रंग झेंडू, पालक, हळद व बीट पासून बनवली गेली.
उत्तराखंडमधील ग्रामीण भागातील महिलांनी रंग बनवले, Ecocradle essential च्या महिला कामगारांनी त्याची पँकिंग केली व पुण्यातील सामाजिक संस्था ‘मिट्टी के रंग’ तसेच होप फाउंडेशन अंतर्गत पल्लवी वाघ व मनिषा यांनी त्यांची विक्री केली.
या उपक्रमात अगदी रंग बनवण्यापासून रंग विकेपर्यंत सर्व महिलाच काम करत होत्या. ह्यांचे कौतुकच आहे. हळूहळू का होईना महिला पुढे येताय स्वतःचे अस्तित्व निर्माण करताय हे बघून छान वाटते. असेच महिलांनी एकमेकींना सपोर्ट करत पुढे यावे, सक्षम व्हावे असे मयुर कुऱ्हाडे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.