अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात मतदानप्रक्रिया पार पडली तसेच निकाल देखील घोषित झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी दिगज्जनी नेतृत्वाची कमान स्वीकारण्यास हालचाली सुरु केल्या आहेत.
नुकतेच कर्जत तालुक्यातील कोंभळी ग्रामपंचायतीवर माजी सरपंच दीपक गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनलने एक हाती सत्ता घेऊन वर्चस्व मिळविले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोंभळी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच दीपक माणिक गांगर्डे हे किंगमेकर ठरले आहेत. विरोधी भैरवनाथ शेतकरी ग्रामविकास पॅनलला एकाच जागेवर विजयी मिळाला आहे.
तर एक जागा बिनविरोध झाली होती. स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनलला मोठ्या मताधिक्याने बहुमत मिळाले आहे. दीपक गांगर्डे यांच्या नेतृत्वाला कोंभळी येथील मतदारांनी मोठा विश्वास दाखवत स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनलला विजयी केले आहे.
निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार मारुती रामा उदमले, अनुराधा साहेबराव काकडे, गोरक्ष उत्तम गांगर्डे, दीपक माणिक गांगर्डे, सविता नितिन उदमले,
ज्योती सतीश दरेकर, शर्मिला राहुल गांगर्डे. पॅनल प्रमुख दीपक गांगर्डे या वेळी म्हणाले, कोंभळी गावात राजकारण करत असताना सर्व सामान्य जनतेला विश्वासात घेऊन गटतट विसरून गावचा सर्वांगीण विकास करू, अशी ग्वाही दिली.