संगमनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले, मतमोजणी झाले आणि निकाल देखील घोषित झाले. अनेक ठिकाणी दिग्गजांनी आपली सत्ता कायम राखत ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवले.

यातच संगमनेर तालुक्यात देखील दिग्गजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडल्या होत्या व यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.

दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे सर्व 9 उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

विरोधी गटाला साधे खातेही उघडता आलेले नाही. सावरगाव घुले ग्रामपंचायतचा कारभार हाकण्यासाठी तीन प्रभागांमध्ये 9 कारभारी निवडून आणण्यासाठी शेतकरी विकास मंडळाने सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले होते.

प्रभाग एकमध्ये नामदेव कोंडाजी घुले, सुजाता नवनाथ घुले, प्रणाली शिवाजी बोर्‍हाडे, प्रभाग दोनमध्ये अलका जिजाबा घुले, घमाजी भुतांबरे,

राजू भाऊसाहेब खरात, प्रभाग तीनमध्ये सीमा बाबासाहेब कडू, राजेंद्र शत्रुघ्न घुले, लिलाबाई लहानू घुले हे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत.

गावातील मुलभूत प्रश्न आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली. सावरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे.

नवनिर्वाचित सदस्यांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.किरण लहामटे, इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24