अहमदनगर बातम्या

भिंगार येथील श्रीराम मंदिर जिर्णोेद्धारसाठी धनराज चावरिया यांच्यावतीने 51 हजारांची देणगी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- भिंगार येथील श्रीराम मंदिराच्य जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून, या मंदिराच्या जिर्णोद्धासाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज चावरिया यांनी 51 हजार रुपयांची देणगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन गोहेर यांच्याकडे सुपूर्द केली.

याप्रसंगी वाल्मिकी समाज पंचायतचे अध्यक्ष रवी मोरकरोसे, सचिव तुलसीदास निधाने, उपाध्यक्ष संतोष छजलाने, ट्रस्टचे कोषाध्यक्ष अनिल मट्टू आदिंसह वाल्मिकी समाज पंचायतचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी धनराज चावरिया म्हणाले, प्रभु श्रीराम हे समस्त हिंदूंचे दैवत आहे, त्यांची जीवनकार्य हे आपणा सर्वांना नेहमीच मार्गदर्शक राहिले आहे.

आज आयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण होत आहे. त्याच धर्तीवर भिंगार मधील पुरातन श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार होत आहे ही सर्वांसाठी आनंददायी बाब आहे. या निर्माण कार्यात प्रत्येकाने सहभाग द्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन गोहेर म्हणाले, भिंगार मधील श्रीराम मंदिर हे ऐतिहासिक व पौराणिक असे आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे.

भव्य व आकर्षक कलाकृतीयुक्त असे मंदिराचे काम होणार असून, त्याचबरोबर परिसराचाही विकास करुन भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

यासाठी अनेक दानशूर मदतीचा हात पुढे करत आहेत. श्री.धनराजजी चावरिया यांनी दिलेल्या देणगीमुळे मंदिर निर्माण कार्यास गती मिळणार आहे. त्यांचा आदर्श इतरांना घेऊन या जिर्णोद्धाराच्या कामात देणगीरुपे सहकार्य करावे,

असे आवाहन केले. याप्रसंगी रवी मोरकरोसे यांनी वाल्मिकी समाज पंचायतीच्या कार्याची माहिती दिली. श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने श्री.धनराज चावरिया यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी अनिल मट्टू यांनी आभार मानले.

Ahmednagarlive24 Office