अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-आपण आजवर अनेकदा गुन्हेगारी पार्शवभूमी असलेले सिनेमांमध्ये डॉन या खलनायकाची भूमिका पहिली असेल. या खलनायकाचा फोन आला कि समोरच्याची तोतरी वळते, असे आजवर आपण सिनेमांमध्येच पाहिले. मात्र असाच काहीसा प्रकार अकोले मध्ये घडला आहे.
फोन खणखणला त्याने उचलला व कानाला लावला व समोरचा बोलला ‘मी छोटा राजन बोलतोय!’ हे ऐकून घाबरलेल्या त्याने पुन्हा विचारले. आपण कोण बोलतायं…? अरे तुला समजत नाही का? मी छोटा राजन बोलतोय! … बस काय मग भाऊ झाले घामाघूम, त्यानंतर त्या युवकाने मोबाईल स्वीचअप केला आणि डॉनच्या भितीपोटी त्याने दोन दिवस घरच सोडले नाही.
ही घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, अकोले नाका परिसरातील एका युवकाने नवीन मोबाईल व सीमकार्ड घेतले.त्याने आपल्या मोबाईलमध्ये स्वत:चे नाव सेव करण्याऐवजी छोटा राजन असे नाव सेव केले. या नंबरवरुन मित्राला फोन जाताच छोटा राजनचा फोन आल्याचे त्याला वाटले.
त्याने विचारणा केली असता मी छोटा राजनच बोलतोय, असे या मित्राने सांगितले. डॉनच्या भितीपोटी घाबरलेल्या त्या युवकाने दोन दिवस त्याने घर सोडलेच नाही. घरच्यांनीही चौकशी केल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, गंमत करणारा मित्र त्याच्या घरी आला. तुला छोटा राजनचा फोन आला होता काय? असे विचारले. हो आला होता. आणि मी पोलीस ठाण्यात ही माहिती देणार आहे.
यानंतर गडबडलेल्या या मित्राने छोटा राजनच्या नावाने फोन मीच केला होता. तुला फसविण्यासाठी मी मोबाईलमध्ये छोटा राजन नाव टाकले, असे सांगून त्याने आपला मोबाईल दाखविला. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. शहरात हा चर्चेचा विषय बनला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved