अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट कायम असून या दहशतीमधून सुटका होती न तोच जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक पुन्हा एकदा दहशतीखाली वावरू लागली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी शिवारात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध महिलेचे तोंड दाबून रोकड व दागिने लुटून नेण्याचा प्रकार घडला. काल 03 च्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी कांताबाई बबन घोडेकर,वय ७०रा. डीवायबी चारी, घोडेकर वस्ती, ता, श्रीगोंदा या वृद्ध महिलेने बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांताबाई घोडेकर या वृद्ध पहिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, 03 च्या सुमारास अज्ञात तिघा आरोपींनी कडीकोंडा तोडून घरात घुसत माझे तोंड दाबले तसेच ओरडू नको, पेसे सोने काढून दे, असे म्हणत मला गज मारला.
पलंगाखाली पत्र्याच्या पेटीत ठेवलेले २० हजार रुपये व कानातील सोन्याचे दागिने लुटून नेले. तिघे चोरटे तरुण होते. त्यांनी काळे कपडे घातलेले होते. घटनास्थळी डिवायएसपी जाधव यांनी भेट दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved