Ahmednagar News : मराठा बांधवांचा ताब्यात असलेल्या शेळके कुटुंबाची गुलाबराव शेळके महानगर शेडयुल्ड बँकेत राजकारण येऊ देऊ नका व कोणी ही राजकारण करू नका, असे आवाहन नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
दिवंगत अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त पिंपरी जलसेन येथे आयोजित शोकसभेत कर्डिले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, त्यावेळेस गुलाबराव शेळके यांनी महानगर बँकेचे छोटेसे रोपटे लावले,
त्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळे या बँकेत कोणीही राजकारण आणू वा करू नये. एकोपा टिकवून ठेवा. बँकेसाठी सर्वांनी त्यागाची भूमिका ठेवावी. उदय शेळके यांचे व माझे अतिशय जवळचे संबंध होते, आम्ही कायम एकमेकांचा सल्ला घेत होतो, असेही कर्डिले शेवटी म्हणाले.
आ. निलेश लंके यांनी सांगितले की, बैंक ही एक काचेचे ‘भांडे आहे, पण उदय शेळके यांनी त्यांच्या हयातीत ते सक्षमपणे सांभाळले. त्यांच्यापश्चात त्यांच्या मातोश्री सुमनताई शेळके, भगिनी स्मिता शेळके व पत्नी गितांजली सक्षमपणे चालवितात, असेही आ. लंके म्हणाले.
जि. प. चे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे म्हणाले की, उदय शेळके यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते, त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येईल, असे कधीही वाटले नाही.
या वेळी मातोश्री व महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके, संचालिका स्मिता शेळके, महानगर बँक व नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गितांजली शेळके, त्यांच्या कन्या, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आ. प्रकाश धात्रक, माजी आ. बापूसाहेब पठारे, जि.प. चे मा. अध्यक्ष अरुण कडू,
माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, पारनेरचे निबंधक गणेश औटी, माजी सभापती मंगलदास बांदल, सुदाम पवार, जयश्री औटी, डॉ. धनश्री सुजय विखे, माजी नगराध्यक्ष विजू औटी, नगरसेवक रविंद्र इथापे, महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद,
सर्व संचालक, बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद, साई मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव चेडे, बाबाजी तरटे, अशोक सावंत, किसनराव लोटके, रावसाहेब रोहोकलेंसह सहकार, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट व ग्रामस्थ उपस्थित होते.