‘नको शासनाच्या भरवशावर; एकमेकांच्या सहकार्याने मात करू कोरोनावर’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर आ. पिचड यांनी शासनावर शरसंधान साधले आहे.

ते म्हणाले, ‘अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण अधिक वेगाने वाढत असून आपण सामाजिक भावनेतून या संकटाला सामोरे जाऊ या, शासन व प्रशासनाच्या भरवशावर न राहता आपणच सर्वजण पुढे येऊन यावर मार्ग काढू.

मात्र तुम्ही सोबत राहा’. काल अकोले तालुका डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांची माजी आ. वैभवराव पिचड यांनी अकोले विश्रामगृहावर बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, दोन-तीन दिवसांत एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो तसेच कोरोना स्कोर 1 ते 5 पर्यंतचे अकोले येथील डॉक्टरांना त्यांचे दवाखान्यात उपचार करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी,

अशी मागणी केली जाईल, तसेच अकोले येथील कोव्हिडचे सेंटर कमी पडत आहे. त्यासाठी मी 50 बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करीत आहे,

फक्त त्यासाठी शासनाने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणे आणि औषधोपचार पुरविणे गरजेचे आहे. सर्व जनतेने सावध राहावे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पिचड यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24