लोकांचा तळतळाट घेऊ नका तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा ते फेडावं लागेल..?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जीवन प्राधिकरणच्या एकाच अधिकाऱ्याकडे शेकडो पाणी योजनांची कोट्यवधींची त्यांची कामे चालू आहेत. नेमकी काम कसे व कोण करते. सर्वत्र समजून उमजून गैरप्रकार . मात्र बोलत कुणीच नाही.

तू मारल्यासारखे कर, मी रडल्याचे नाटक करतो. जेवायला बसताना तांबेभर पाणी अगोदर मांडी जवळ घेऊन बसावे लागते. पाणीच नाही अशा अवस्था तालुक्यातील अनेक गावांची होत आहे.

सरपंच म्हणतात, पाईप बदलून निकृष्ट टाकले. अधिकारी म्हणतात, तसे काही नाही. विनापरवाना रस्ते खोदण्याच्या तक्रारी, महामार्ग व जिल्हा मार्ग खोदून पाईप गाडण्याच्या तक्रारी. तरीही अधिकारी म्हणतात ८० टक्के काम पूर्ण. गावचे जबाबदार कार्यकर्ते म्हणतात, वर्षभरात टाकीत पाण्याचा थेंब नाही.

तर काही गावात दोन वेळा पाणी दिले जाते. मोठ्या गावात महिन्यातून एक वेळ पाणी तरी अधिकारी म्हणतात, पाणीपुरवठा सुरू आहे.

जेथे खिसे भरून मोकळे झाले, कोट्यवधींचा खर्च, पाणी मात्र थेंब भर नाही. भंगार पाईप लाईन वापरून लोकांचा तळतळाट घेऊ नका.

लेकरा बाळांना सुद्धा फेडावं लागेल. एकदा कागदपत्री योजना पूर्ण झाली की पुन्हा तीस वर्षे कोणी त्याकडे बघणार नाही. पाण्याच्या थेंबासाठी आम्ही तरसत आहोत. तुम्ही बनवाबनवी करून आमची चेष्टा करू नका.

अशा अत्यंत तीव्र भावना स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीनी व्यक्त केल्या. निमित्त होते पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मिरी व ३९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीचे.

ही बैठक आमदार तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी अधिकारी व त्यांच्या कामाबद्दल तक्रारी ऐकून आमदार प्राजक्त तनपुरे सुद्धा अवाक झाले. चक्क डोक्याला हात मारून घेतला.

पुढे आमदार तनपुरे म्हणाले, लोकांनी तक्रार केलेल्या जलवाहिन्या त्वरित बदला. अधिकारी बनवाबनवी करतात, असे दिसते. चेष्टा केल्यासारखे बोलू नका.

तुमच्या सर्व कामाबद्दल लक्षवेधी सूचना सभागृहात करून शासनाचे लक्षवेधू. तालुक्यातील एका गावात मूळ जलवाहिनी चार किलोमीटरची .मात्र वाढीव जलवाहिनीसाठीचा प्रस्ताव चक्क १२ किलोमीटरचा.

धन्य आहे काम, व धन्य आहेत अधिकारी. अर्धवट काम सोडून ठेकेदार फरार कसा होतो. मूळ कामापेक्षा पुरवणी वाढीव कामाचे अंदाजपत्रक जास्त. तुमच्यापुढे हसावे की रडावे.

अशी अवस्था झाली आहे. मात्र पुढील बैठकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. अशा सूचना देत कामात सुधारणा करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.