अहमदनगर बातम्या

अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकुर रुजू.

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदावर डॉ. रवींद्र ठाकुर यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी अहमदनगर या पदाचा कार्यभार घेतला.

डॉ.रवींद्र ठाकूर यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक म्हणून वृत्त शाखेत कार्यरत होते. डॉ.ठाकुर यांची सन 2006 पासून जिल्हा माहिती अधिकारी, रायगड (अलीबाग) या कार्यालयात माहिती अधिकारी या पदावर शासकीय सेवेची सुरूवात झाली.

त्यानंतर 2009 ते 2011 या कालावधीत माहिती व जनसंपर्क विभागात मुंबई येथे सहायक संचालक पदावर त्यांनी काम केले. 2011 ते 14 या कालावधीत नाशिक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात माहिती अधिकारी पदावर त्यांनी काम केले.

सन 2014 ते 2016 या कालावधीत औरंगाबाद येथील संचालक (माहिती) कार्यालयात सहायक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर 2016 पासून पुन्हा मुंबई येथे वृत्तशाखेत सहायक संचालक (माहिती) म्हणून कार्यरत होते. श्री. ठाकुर हे मुळचे जळगांव येथील असून त्यांचे महाविद्यालयीन व पत्रकारितेतील शिक्षण जळगांव व पुणे येथे झाले आहे.

त्यांनी पत्रकारिता (जनसंपर्क) विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवी संपादन केली आहे. डॉ ठाकुर यांनी, वृत्तपत्रात, आकाशवाणी या माध्यम क्षेत्रात काम केले असून पत्रकारिता विभागात प्राध्यापक म्हणून ही काम केले आहे.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी वरिष्ठ लिपिक संतोष गुजर, सिनेयंत्रचालक धनंजय जगताप, कनिष्ठ लिपिक सुरज लचके, वाहनचालक अरुण सोनवणे उपस्थित होते.

पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ.ठाकुर यांनी उपमाहिती कार्यालय, शिर्डी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. यावेळी माहिती सहायक जयंत करपे, छायाचित्रकार सुनिलदत्त शिवदे, कनिष्ठ लिपिक प्रविण पाटील उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office