डाॅ. नीलेश शेळकेला या तारखेपर्यंत काेठडी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- बोगस कर्ज प्रकरण करून त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अटक आराेपी डॉ. नीलेश शेळके याला न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नगर शहरात एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. नीलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले.

त्यानंतर शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने बोगस कर्ज प्रकरणे करून घेत त्या रकमेचा अपहार केला, असा या प्रकरणातील फिर्यादींचा आरोप आहे. याप्रकरणी प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे यांनी कोतवाली ठाण्यात दिलेली आहे.

फिर्यादीवरून डॉ. शेळके याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. शेळके याला शुक्रवारी दुपारी पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24