अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-नगरमधील मागील पिढीतील प्रसिध्द वकील कै.गजानन तथा भाऊसाहेब सप्तर्षी व कै. प्रमिलाबाई सप्तर्षी यांचा नातू डॉ.वरद सप्तर्षी यांनी नुकतेच दंत वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षेत संपूर्ण देशात 433 वा क्रमांक मिळवून लक्षणीय यश संपादन केले आहे.
या वर्षी तब्बल 25 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. डॉ. वरद सप्तर्षी यांनी यापूर्वीही बी.डी.एस. पदवी करत असताना दर वर्षी पहिल्या 3 क्रमांकांमधे स्थान पटकावले, तर 5 वर्षात 9 विषयात डिस्टिंक्शन म्हणजेच विशेष श्रेणी प्राप्त केली,
पहिल्या वर्षात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील कुलगुरू यांचे मेरिट अवॉर्ड मिळवले, अंतिम वर्षात इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड रेडियोलॉजी चे अवॉर्ड व सलग 3 वर्षेकोलगेट स्कॉलरशिप,
ई. असे खूप यश त्यांना प्राप्त झाले आहेत. राजेंद्र व प्राची सप्तर्षी हे कलाकार दांपत्य कर्णबधिर असूनही त्यांचा मुलगा डॉ.वरद यशाच्या शिखरावर कुणाचेही मार्गदर्शन नसताना पोहोचला त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.