अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यात पावसाचे पाणी वाहून जाण्याची ओढ्याची नैसर्गिक प्रक्रिया थंडावल्याने हे पाणी शेतातील उभ्या पिकांबरोबरच घरात घुसल्याने पिंपळाचा मळा, राहुरी काॅलेज परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या आठवडेभरापासून राहुरीत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला.
राहुरी नगर परिषद कार्यक्षेत्रातील पिंपळाचा मळा परिसरात पावसाचे पाणी उभ्या पिकासह घरात घुसल्याने मका, कांदा, घास, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे.
पिंपळाचा मळा परिसरात अस्तित्वात असलेले ओढे गायब झाले असून पावसाचे पाणी वाहून जाण्याची प्रक्रिया थंडावल्याने परिसरातील शेतीत पावसाचे पाणी साचले आहे, असे राहुरी परिसरातील शेकऱ्याने सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com