अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमनगर जिल्हयातील ‘या’ ३४ महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर ! मिळणार ‘या’ सवलती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने पावसाच्या आधारावर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी तालुक्यातील सुमारे १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता.

त्यापैकी विभाजन झालेल्या राज्यातील २४० नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती लागू करण्यात आली आहे.

यात नगर जिल्ह्यातील ३४ मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे या मंडळातील अनेक सवलती मिळणार असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

  • नगर जिल्ह्यातील महसूल मंडळे
    नेवासा-भानसहिवरे, प्रवरासंगम, देडगाव. राहाता अस्तगाव.
    श्रीरामपूर-कारेगाव.
    कोपरगाव-कोकमठाण.
    अकोले-खिरविरे, लिंगदेव, वाकी, रूभोडी.
    राहुरी-बारागावनांदूर.
    संगमनेर-नांदुरखंदरमाळ, संगमनेर खुर्द, निमोण, घुलेवाडी.
    कर्जत-कोरेगाव, खेड, कुळधरण, वालवड.
    नगर-नेप्ती.
    पाथर्डी-अकोला, खरवंडी, तिसगाव.
    पारनेर-कान्हुरपठार, पळवे खुर्द, जवळा, अळकुटी.
    श्रीगोंदा भानगाव, अढळगाव, लोणी व्यंकनाथ.
    शेवगाव-मुंगी, दहिगावने.
    जामखेड-साकत, पाटोदा.
  • ■दुष्काळीसदृश नागरिकांना कोणत्या सवलती मिळतील?
  • ■जमीन महसुलात सूट दिली जाईल
  • ■सहकारी कर्जाचे पुनर्गठन होईल
  • ■शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  • ■कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट मिळेल
  • ■शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • ■रोहयोतंर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता
  • ■आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
  • ■टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती मिळतील.
Ahmednagarlive24 Office