अहमदनगर बातम्या

साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता शहरातील प्रत्येक प्रभागात होणार औषध फवारणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- कोरोनाचा कहर कायम असताना गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात साथरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता.

मात्र या महत्वाच्या प्रश्नी नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणी, फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करण्याचे आदेश महापौर यांनी दिले.

प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणी, फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे व हवामानात बदल झाल्यामुळे शहर व उपनगरात साथ रोगांचे रूग्ण वाढले आहेत. यावर उपाय योजना बाबत मलेरिया विभागाची बैठक महापौर शेंडगे यांनी घेतली.

या गोष्टींची आवश्य काळजी घ्या….

शहर व उपनगरात प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात यावी.

नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

पाण्याची टाकी आठ दिवसातून एकदा स्वच्छ धुवून घ्यावी.

साथ रोग डासांमुळे होत असल्यामुळे डास होवू नये यासाठी काळजी घेणे.

Ahmednagarlive24 Office