अतिवृष्टीमुळे ‘हे’ पीक आलं धोक्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मुगाची विक्रमी पेरणी केली. मुगाची उगवण देखील चांगल्याप्रकारे झाली, मात्र सतत व अवेळी झालेल्या पावसामुळे या पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मुगाचे पीक धोक्यात आले आहे.

कृषी विभागामार्फ़त खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना पिकविलेल्या मालाला बाजारभाव मिळत नाही. परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

परंतु मार्च महिन्यापासून दूध दरात प्रतीलिटर 15 रूपयांची घसरण झाली असल्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. पाण्याचा शाश्वत स्त्रोत नसल्याने परिसरातील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. नगदी समजले जाणारे व कमी खर्चात जास्त उत्पादन मिळून देणारे पिक म्हणून मुगाकडे पाहिले जाते.

मात्र चालू वर्षी मुगाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकर्‍यांमधून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्यावतीने पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी सरपंच सुभाष दिवटे, भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, वाळवणेचे सरपंच उत्त पठारे,

वाघुंड्याचे सरपंच संदिप मगर, उपसरपंच दौलत गांगड, प्रकाश गुंड, ग्रामपंचायत सदस्य प्रविण दिवटे, प्रकाश पिसे, ज्ञानदेव जगताप, प्रमोद दिवटे यांनी केली आहे.

जिरायती पट्ट्यात खरीप हंगामातील मुग, बाजरी, कांदा व इतर पिकांचे वातावरणातील बदलामुळे व अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मुग पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून ते पिवळे पडले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24